Shopping cart

  • Home
  • News
  • कर्करोग आणि डोळ्यांचा शिबीरात १०६ नागरिकांची तपासणी

कर्करोग आणि डोळ्यांचा शिबीरात १०६ नागरिकांची तपासणी

June 10, 20251 Mins Read
171

India Morning News

Share News:
Share

कन्हान : – अनुकंपा बहुउद्देशीय संस्था कन्हान च्या वतीने दिवटे हाऊस तारसा रोड येथे शनिवार (दि.७) जुन रोजी मोफत कर्करोग आणि डोळे तापासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले .

एचसीजी कैंसर सेंटर नागपुर चे डॉ.कमलजीत कौर , हेड आॅफिसर डॉ.जगताप मॅडम , आरोग्य अधिकारी डॉ श्रद्धा भगत , डॉ जयश्री मेश्राम यांचा सहकार्याने शिबिरात नागपूर येथील एचसीजी कर्करोग केंद्राच्या अनुभवी डॉक्टरांकडून अत्याधुनिक मशीनच्या मदतीने कर्करोगाची तपासणी करण्यात आली . तसेच तोंडी तपासणी , रक्त तपासणी , स्तनाच्या कर्करोगाची आणि डोळ्यांची तपासणी केली . संभाव्य आजारांचे निदान आणि उपचार याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली . कर्करोगापासून बचाव करणे शक्य व्हावे म्हणून एचपीव्ही लसीकरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती लाभार्थ्यांना देण्यात आली . या मोफत शिबीराचा १०६ नागरिकांनी लाभ घेतला . शिबीराचे आयोजन समाजसेविका सुनंदा दिवटे , संस्था सचिव स्वर्णलता सहारे , सदस्य राहुल सोमकुवर यांनी केले . शिबीरात खासदार श्यामकुमार बर्वे , जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ.रश्मी बर्वे , माजी नगरसेवक राजेंद्र शेंदरे , माजी नगरसेविका सुषमा चोपकर , संगीता खोब्रागडे , अनिता पाटील , राखी परते , स्वाती पाठक , प्रतिक्षा चवरे , रंजना किरपान , अॅड. आशा पनिकर , मीना कळंबै , बिरेंद्र सिंह , शैलेश शेळके , आशिष दिवटे , संजय रंगारी , नेवालाल सहारे सह आदि नागरिक उपस्थित होते . शिबीर यशस्वी करण्याकरिता आरोग्य सेविका शालिनी वाल्दे , मंजुषा पडवेकर , धनश्री खेडेकर , प्रियंका सोनबोईर , हरिदास पराते , तुषार लांजेवार , राजेश गांजवे , महेंद्र सांगोडे सह आदि नागरिकांनी सहकार्य केले .

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share