Shopping cart

  • Home
  • News
  • कन्हान ग्रामीण मधुन शेतकरी कर्जमुक्तीचे १२१ अर्ज सादर

कन्हान ग्रामीण मधुन शेतकरी कर्जमुक्तीचे १२१ अर्ज सादर

May 27, 20251 Mins Read
414

India Morning News

Share News:
Share

कन्हान ग्रामीण मधुन कर्जमुक्ती अर्ज’ देण्यासाठी उत्सफुर्त प्रतिसाद

कन्हान : – शेतकरी नेते व किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशभाऊ पोहरे यांच्या आवाहना ला शेतकऱ्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद देत दुसऱ्या टप्यात कन्हान ग्रामीण भागातुन पारशिवनी तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या यादीसह निवेदन देऊन,सहाय्यक निबंधक कार्यालयात मागेल त्यालाच /गरज त्यालाच कर्जमुक्तीचे १२१ अर्ज सादर करण्यात आले.

सोमवार (दि.२६) मे २०२५ ला दैनिक देशौन्नती चे मुख्य संपादक व शेतकरी नेते आणि किसान ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष प्रकाशभाऊ पोहरे यांच्या आवाहना ला शेतकऱ्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद देत दुसऱ्या टप्यात कन्हान ग्रामीण भागातुन पारशिवनी तालुक्यातील शेतकरी पोहचुन शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पारशिवनी तहसीलदार सुभाष वाघचौर यांना भेटुन शेतकरी कर्जमुक्ती एकुण १२१ अर्ज शेतकऱ्यांच्या नावाच्या यादी सह निवेदन दिले. तसेच सहाय्यक निबंधक पालटकर यांना शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती चे एकुण १२१ अर्ज सादर करण्यात आले.

या प्रसंगी देशौन्नती कन्हान प्रतिनिधी मोतीराम रहाटे, पत्रकार कमलसिह यादव व किसान ब्रिगेडचे राहुल वानखेडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या नावाच्या यादीसह निवेदन तहसीलदार सुभाष वाघचौर आणि कर्जमुक्तीचे १२१ शेतकऱ्यांच्या नावाच्या यादी सह निवेदन सादर केले.शिष्टमंडळात मोतीराम रहाटे, राहुल वानखेडे, कमलसिंह यादव, पवन काठोके, रामु लांडगे, गजानन लेकुरवाळे, आत्माराम उकुंडे, रविंद्र गुडधे, पुरणदास तांडेकर, श्रीराम नांदुर कर, मनोज गुडधे, सुभाष मोहनकार, शंतनु ठाकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यानंतर सहाय्यक निबंधक पारशिवनी कार्यालयात मागेल त्यालाच / गरज त्यालाच कर्ज मुक्तीचे कन्हान – ५, कांद्री ५, केरडी- २१,वाघोली – ९, तेलनखेडी – १२, बोरडा – २३, सिंगारदिप ७, निमखेडा – ९, वराडा – ६ , गहुहिवरा – २, साटक- ५, डुमरी खुर्द – १, बखारी – १, टेकाडी- १, बोरी- १, खंडाळा (डुमरी)- २, खेडी- ५, जुनिकामठी – २, गोंडेगाव – ४ असे एकुण १२१ अर्ज सादर करण्यात आले.

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share