India Morning News
अकोला:जम्मू-काश्मीर आणि भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढता तणाव, तसेच सातत्याने होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांमुळे उत्तर भारतात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातील एकूण ४० श्रद्धाळू कटरा येथे अडकले असून, त्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातून वैष्णो देवीच्या दर्शनासाठी गेलेले २२ श्रद्धाळू सध्या कटरामधील एका खासगी हॉटेलमध्ये थांबले आहेत. दर्शनानंतर हे सर्व जण परतीच्या प्रवासासाठी सज्ज होते, परंतु कटरा ते जम्मू दरम्यान प्रवास करता न आल्यामुळे त्यांना कटरामध्येच थांबावे लागले. त्यांच्या समवेत अकोला जिल्ह्यातील १८ श्रद्धाळूही अडकले असून, यामध्ये १३ लहान मुलांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांमध्येही चिंता वाढली आहे.
या सर्व श्रद्धाळूंनी स्थानिक प्रशासनाकडे आणि सरकारकडे आवाहन केले असून, रेल्वे किंवा अन्य पर्यायी मार्गाने लवकरात लवकर त्यांना सुरक्षितरित्या त्यांच्या गावी पोहोचवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या ते कटरामधील एका हॉटेलमध्ये तात्पुरते थांबले असून, परतीची कुठलीही ठोस व्यवस्था न झाल्यामुळे ते चिंतेत आहेत.सरकार व प्रशासन या श्रद्धाळूंना तातडीने मदत करतील, अशी अपेक्षा त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.











Comments are closed