India Morning News
आरोपी पसार , पारशिवनी पोलीसात गुन्हा दाखल
कन्हान : – पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत खंडाळा डुमरी गावात राहणाऱ्या ६० वर्षीय निवृत्त पाटबंधारे कर्मचाऱ्याची अज्ञात इसमांनी धारदार शस्र्राने वार करुन निर्घृण हत्या केली . ज्यामुळे गावात शोककळा पसरली आहे .
प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.८) जुन रोजी दुपारी खंडाळा डुमरी गावातील रहिवासी हिरालाल लक्ष्मण पुरे हे त्यांच्या मित्रांसह शंकरपट पाहण्यासाठी उमरेडला गेले होते . उमरेडहून सर्व मित्र परतले , हिरालाल पुरे वगळता सर्व मित्र गावी गेले . हिरालाल पुरे आपली दुचाकी वाहन घेण्यासाठी आशुदा धाबाच्या विरुद्ध दिशेने असलेल्या चहाच्या दुकानात गेले . दुकानाजवळ अज्ञात इसमांनी धारदार शस्र्राने गळ्यावर व पोटावर वार करुन हत्या केली . नागपुर – जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर असलेल्या कालव्याखाली स्थानिक नागरिकांना हिरालाल पुरे यांचा मृतदेह आढळून आला . स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पारशिवनी पोलीसांना दिली असता प्रभारी पोलीस निरीक्षक राजेश थोरात पथकासह घटनास्थळी पोहोचले . पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले . सदर प्रकरणा बाबत पारशिवनी पोलीसांनी आकाश हिरालाल पुरे (वय २८) रा.खंडाळा (डुमरी) यांचा तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल केला आहे . सदर घटना गांभीर्याने घेत नागपुर ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस निरीक्षक रमेश थोरात यांना आवश्यक सुचना देऊन तात्काळ आरोपींना अटक करून योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे .








Comments are closed