India Morning News
खंडाळा (डुमरी) शिवारात धक्कादायक घटना , आरोपी पसार , पारशिवनी पोलीसात गुन्हा दाखल
कन्हान : – पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत खंडाळा (डुमरी) शिवारात ६० वर्षीय वृद्ध इसमाचा खुन करुन मृतदेह पेंच प्रकल्पाचा भंडारा कालव्यात फेकले , या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे . ते पाटबंधारे विभागातुन काही महिन्यापुर्वी सेवानिवृत्त झाले होते .
प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.८) जुन रोजी हिरालाल लक्ष्मण पुरे (वय ६०) रा.खंडाळा हे उमरेड तालुक्यातील खामरी येथे शंकरपट पाहायला गेले होते . त्यांनी आपली दुचाकी वाहन नागपुर जबलपुर महामार्गा वरील खंडाळा शिवारात आशुदा धाबाच्या विरुद्ध दिशेने असलेल्या चहाच्या दुकानात ठेवली होती . रात्री खामरी वरुन शंकरपट पाहुन सर्व मित्र परतले , हिरालाल पुरे आपली दुचाकी वाहन घेण्यासाठी आशुदा धाबाच्या विरुद्ध दिशेने असलेल्या चहाच्या दुकानात गेले . दुकानाजवळ अज्ञात इसमांनी धारदार शस्र्राने गळ्यावर व पोटावर वार करुन त्यांचा निर्घुण खुना केला आणि मृतदेह पेंच प्रकल्पाचा भंडारा कालव्यात फेकला .
खुप उशिरा रात्री पर्यंत हिरालाल घरी न परतल्याने त्याच्या मुलगा आकाश पुरे ला कळले की त्याचे वडील शंकरपटाला पाहायला गेले आहेत . रात्री उशिरापर्यंत हिरालाल घरी परतले नाही तेव्हा मुलाने विष्णू राऊतला त्याच्या वडिलांबद्दल विचारले. विष्णूने सांगितले की धनीराम बागडेंच्या गाडीने येत आहे आणि तो त्यांची वाट पाहत असावा. मुलगा धनीराम बागडेंच्या घरी गेला तेव्हा धनीराम घरातच होता. मुलाचे वडील बस स्टँडवर दिसले नाहीत तेव्हा धनीराम ने सांगितले की हिरालाल येईल. मुलगा आपल्या वडिलांना शोधत चहाच्या टपरीकडे गेला जिथे त्याला त्याच्या वडिलांची दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४० सीपी ८९९५ तिथे पार्क केलेली दिसली . जवळच वडिलांचे चप्पल आणि मोबाईल पडलेले होते.
भंडारा लहान कालव्याजवळ गंभीर अवस्थेत आढळला
यावर धाकट्या भावाने मोठ्या भावाला वडिलांना शोधण्यासाठी बोलावले. दोन्ही भाऊ त्यांच्या वडिलांना शोधत कालव्याजवळ पोहोचले. एका भावाला भंडारा लहान कालव्यात उतरून पाहिले तेव्हा त्याला त्याचे वडील हिरालाल गंभीर जखमी अवस्थेत पडलेले दिसले . त्याला ताबडतोब कामठी येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असता येथील डॉक्टरांनी हिरालालला सरकारी रुग्णालयात नेण्यास सांगितले. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि हिरालालला मृत घोषित केले . सदर घटनेची माहिती पारशिवनी पोलीसांना मिळताच पारशिवनी पोलीस रुग्णालयात पोहोचले . सदर घटना गांभीर्यने लक्षात घेऊन नागपुर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ , उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते , पोलीस निरीक्षक राजेशकुमार थोरात घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी आरोपींचे सुगावे शोधण्यास सुरुवात केली . मुलगा आकाश पुरे यांचा तक्रारी वरून पारशिवनी पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक रजेशकुमार थोरात करीत आहे .
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर








Comments are closed