Shopping cart

  • Home
  • News
  • पहलगाम हल्ल्यानंतर 75 पर्यटकांना विशेष विमानाने सुखरूप परत

पहलगाम हल्ल्यानंतर 75 पर्यटकांना विशेष विमानाने सुखरूप परत

April 24, 20251 Mins Read
165

India Morning News

Share News:
Share

जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील अनेक पर्यटक तिथे अडकून पडले होते. महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या पर्यटकांना सुखरूप परत आणणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. भीतीच्या सावटाखाली असलेल्या या पर्यटकांशी संवाद साधून त्यांना धीर देण्यासाठी स्वतः जम्मू-काश्मीरला जाऊन त्यांची भेट घेतली, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

या प्रयत्नांचा परिपाक म्हणून काल रात्री उशिरा विशेष विमानाने 75 पर्यटकांना सुखरूप राज्यात परत आणण्यात यश आले. मुंबई विमानतळावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या पर्यटकांचे स्वागत करत त्यांना दिलासा दिला.

या संकटकाळात पर्यटकांना आधार देण्याचे आणि त्यांना सुरक्षित घरी आणण्याचे कार्य शिवसेनेकडून आणि महाराष्ट्र शासनाकडून अत्यंत व्यवस्थित चोख पाडण्यात आले आहे.आपल्या राज्यात परतल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. त्यामुळे सर्वत्र स्वागताचा वर्षाव नागरिकांवर होत आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share