India Morning News
बीड : अध्यात्म, विचार आणि परंपरेचा संगम असलेल्या बीड जिल्ह्यातील श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या 93 व्या नारळी सप्ताहाचा उत्साह शिरूर कासार तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथे दिसून आला. संत वामनभाऊ यांनी 93 वर्षांपूर्वी सुरू केलेली ही अखंड परंपरा आजही समाजाला दिशा देण्याचे मोलाचे कार्य करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गहिनीनाथ गडाच्या विकासासह बीड जिल्ह्याला पाणीदार करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या नारळी सप्ताहाच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मठाधिपती विठ्ठल बाबा महाराज, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा, मोनिका राजळे, माजी आमदार जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा आणि जिल्हाधिकारी अविनाश पाठक उपस्थित होते.
या दिग्गजांच्या उपस्थितीने सोहळ्याचे महत्त्व अधोरेखित झाले.नारळी सप्ताह हा केवळ धार्मिक उत्सव नसून, समाजाला एकत्र आणणारा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा मंच आहे. संत वामनभाऊ यांच्या विचारांनी प्रेरित हा सोहळा बीडच्या सामाजिक आणि आध्यात्मिक विकासाला चालना देत आहे. यावेळी गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी शासनाच्या योजनांवरही चर्चा झाली, ज्यामुळे स्थानिकांना आशेचा किरण दिसू लागला आहे.






Comments are closed