India Morning News
“माझा बाप शेतकरी” – अजिंक्य रहाणेने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केली मदतीची भावनिक अपील
मुंबई (महाराष्ट्र): राज्यातील मुसळधार पाऊस आणि ओल्या वादळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यासह अनेक भागात शेतीचे मोठे नुकसान झाले असून सरकारने मदत जाहीर केली आहे. या कठीण परिस्थितीत भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे.
अजिंक्य रहाणेने सोशल मीडियावर (इन्स्टाग्राम) खास व्हिडिओ शेअर करत शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
रहाणेने काय सांगितले?
“मी स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल मला चांगलेच माहीत आहेत. आपल्या जेवणातले प्रत्येक घासाचे श्रेय शेतकऱ्यांच्या मेहनतीला जाते. सरकार मदत करत आहे, पण प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे.”
तो पुढे म्हणतो, “मी स्वतः मदत करत आहे, पण प्रत्येकाने शक्य तितका हातभार लावणे गरजेचे आहे. शेतकरी हा समाजाचा कणा आहे. जितकी जास्त मदत मिळेल, तितके त्यांचे जीवन सुलभ होईल.”
सर्वांसाठी आवाहन
अजिंक्य रहाणेचा हा संदेश केवळ भावनिक नाही तर जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. त्याने स्पष्ट केले की शेतकऱ्यांना मदत करणे हे फक्त सरकारचे काम नाही, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.








Comments are closed