Shopping cart

  • Home
  • News
  • नागपूरमध्ये “ऑपरेशन थंडर” अंतर्गत अटक; एम.डी पावडरसह दोन तस्कर पकडले

नागपूरमध्ये “ऑपरेशन थंडर” अंतर्गत अटक; एम.डी पावडरसह दोन तस्कर पकडले

October 17, 20250 Mins Read
Operation Thunder in Nagpur Two smugglers caugh
89

India Morning News

Share News:
Share

नागपूर: पोलीस आयुक्त रविन्द्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “ऑपरेशन थंडर – एकत्र येऊ, नशामुक्त समाज घडवूया” मोहिमेत गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. पोलीस पेट्रोलिंग दरम्यान शिवनकर नगर झोपडपट्टीत दोन संशयित आरोपी एम.डी पावडर विकताना पकडले.

अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे राजु उर्फ रविराज बघेल आणि शुभम शेखर बागडे. त्यांच्याकडून ५७ ग्रॅम एम.डी पावडर, स्वीफ्ट कार, मोपेड आणि मोबाईल जप्त करण्यात आले. तपासात दोन्ही आरोपींनी कबूल केले की, ही पावडर आर्थिक फायद्यासाठी विक्रीसाठी साठवली होती आणि त्यांचा साथीदार वसीम शेख आहे.

दोन्ही आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, त्यांना नंदनवन पोलीस ठाण्यात ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस तपास अद्याप सुरू आहे आणि त्यांच्या संपर्कातील इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share