India Morning News
मुंबई – नेस्को मुंबई येथे आयोजित ट्रेन द एक्सिम्प्रेनर या दहाव्या उपक्रमात दोन हजारांहून अधिक मराठी उद्योजकांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्राचे व्यवसाय मार्गदर्शक आणि उद्यमी महाराष्ट्र उपक्रमाचे संस्थापक डॉ. ओमकार हरी माळी यांनी मराठी उद्योजकांसाठी खास आयोजित केलेला हा देशातील सर्वांत मोठा आयात-निर्यात शैक्षणिक कार्यक्रम ठरला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सक्षम व प्रगत समाजनिर्मितीच्या विचारांवर आधारित या तीन दिवसीय उपक्रमात जागतिक व्यापार, उद्योजकता, मानसिकता परिवर्तन आणि आध्यात्मिक संतुलन यांचा संगम साधून सहभागींचे सर्वांगीण प्रशिक्षण करण्यात आले.

पाया → शोध → परिवर्तन : तीन दिवसांचा प्रवास
पहिला दिवस – पायाभरणी:
आयात-निर्यात क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांसाठी संपूर्ण ब्लूप्रिंट सादर करण्यात आली. पॅकेजिंग, लेबलिंग, बाजार विश्लेषण, एचएस कोड शोध, स्पर्धकांचे अध्ययन, खरेदीदार ओळख आणि एआय साधनांचा वापर यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. निर्यात किंमत मॉडेल, पुरवठादार पडताळणी, व्यवसाय नोंदणी आणि गुंतवणूक याबाबत मार्गदर्शन झाले. कार्यक्रमात डॉ. ओमकार यांच्या मार्गदर्शनातून एकत्रित १०३ कोटी रुपये कमावणाऱ्या ११० मराठी उद्योजकांचा सन्मान करण्यात आला.
दुसरा दिवस – शोध प्रक्रिया:
जागतिक खरेदीदारांचे मानसशास्त्र, त्यांचे निर्णय, संवाद पद्धती आणि मार्केटिंग पध्दती स्पष्ट करण्यात आल्या. जीएसटी आणि लॉजिस्टिक्स तज्ञांनी दस्तऐवजीकरण, नियमपालन आणि मालवाहतूक प्रक्रियेचे सोपे विश्लेषण सादर केले. पैशाच्या भीतीवर मात करण्याचे आणि आर्थिक अडचणींवर विजय मिळविण्याचे परिवर्तनकारी प्रात्यक्षिक हा दिवसाचा केंद्रबिंदू ठरला.
तिसरा दिवस – परिवर्तनाचा अनुभव:
मार्गदर्शक रणनीती, प्रेरणा आणि भावनिक प्रगतीबाबत सखोल चर्चा झाली. अनेक मराठी यशस्वी उद्योजकांनी आपल्या संघर्ष आणि यशोगाथा मांडल्या. उद्योजकांना वैयक्तिक मार्गदर्शन देण्याची तयारी डॉ. ओमकार यांनी व्यक्त केली. व्यवसायाचा श्रीगणेशा, वाढ, ऑटोमेशन आणि जागतिक स्तरावर विस्तार यासाठी स्पष्ट मार्ग सादर करण्यात आला. मानसिकता, अभिव्यक्ती आणि आध्यात्मिक समतोलावर भर देत कार्यक्रमाचा समारोप “जय जय महाराष्ट्र!”च्या घोषणेने झाला.
समारोपात डॉ. ओमकार म्हणाले, “प्रत्येक मराठी माणूस उद्योजक बनला पाहिजे—हे फक्त माझेच नव्हे तर आपले सर्वांचे ध्येय आहे.”






