India Morning News
अंत्ययात्रेतील लोकांवर माराहणीचा आरोप , प्रियकर रुग्णालयात दाखल , प्रकृती चिंताजनक
कन्हान नदी शांती घाटावर घडली धक्कादायक घटना
कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील कन्हान शहरात रहिवासी मुलीचे प्रेमात नैराश्य आल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या विरहात अनुरागने मद्यप्राशन केले आणि तो कन्हान नदी शांती घाटावर पोहचला. प्रियसीवर अंत्यसंस्कार होत असतांना अनुरागने तिच्या सरणावर उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला . यावेळी अंत्ययात्रेला उपस्थित लोकांनी प्रियकराला चोप देऊन बाजूला केले.
प्रियसी अंशिका नितिन खोब्रागडे (१९) आणि अनुराग राजेंद्र मेश्राम (२७) दोघेंही एकाच परिसरात राहत असल्याने ओळखत होते आणि नंतर ते प्रेमात पडले . मुलगी काही दिवसान पासुन नैराश्यात राहत होती आणि या कारणामुळे तिने रविवार (दि.८) जुन रोजी सायंकाळी आपल्या राहत्या घरी बेडरुम मध्ये पंख्याला दुपट्याने गळ्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. लहान मुलगी ही ओरडत आली , म्हणाली कि, ताई बाजुच्या रुम मध्ये पंख्याला लटकलेली आहे . वडिल यांनी रुम मध्ये जाऊन पाहिले तर मोठी मुलगी पंख्याला दुपटा गळयाला बांधुन लटकलेली दिसली , तिला आवाज दिला ती बोलली नाही . घरच्यांनी मिळुन खाली उतरवले आणि शेजारीची मदत घेऊन चारचाकी वाहनाने दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले . या प्रकरणी कन्हान पोलीसांनी वडील नितिन खोब्रागडे यांचा तक्रारी वरून मर्ग चा गुन्हा दाखल केला आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रूग्णालय येथे दाखल केले . शवविच्छेदनानंतर मृतदेह सोमवार (दि.९) जुन ला दुपारी २ वाजता च्या दरम्यान कुटुंबीयांचा ताब्यात दिले . सायंकाळी ४ वाजता च्या दरम्यान कन्हान नदी शांती घाटावर मुलीचा पार्थिवावर अंतिम संस्कार सुरु होता . नातेवाईकांनी अग्नी देताच मद्यप्राशन करुन पोहचलेल्या अनुरागने अचानक सरणावर उडी घेण्याचा प्रयत्न केला . मात्र अंत्ययात्रेत आलेल्या लोकांनी त्याला पकडुन रोखले . तो कुणाची ऐकत नव्हता , त्यामुळे लोकांनी त्याला माराहण केली , माराहणीत अनुराग गंभीर जख्मी झाल्याने त्यास कामठीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे .
अनुरागला माराहण केल्याचा आरोप , कारवाई करण्याची मागणी
सदर घटनेची माहिती नवीन कामठी पोलीसांना मिळताच सहाय्यक पोलीस उपायुक्त विशाल क्षीरसागर , पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी रुग्णालयात पोहचुन गंभीर जख्मी अनुराग मेश्रामच्या प्रकृतीची पाहणी केली . या प्रकरणी अनुरागच्या कुटुंबीयांनी मृतक तरूणच्या नातेवाईकांनी माराहण केल्याचा आरोप केला . अनुराग हा शुद्धीवर आल्यावर पोलीस पुढील कारवाई करणार आहे .









Comments are closed