India Morning News
उमरेड : उमरेडमध्ये शनिवारी पहाटे एक धक्कादायक घटना घडली. आकाशातून तब्बल ५० किलो वजनाचा धातूचा तुकडा खाली पडल्याने कसे लेआऊट परिसरात एकच खळबळ उडाली. सकाळी अंदाजे ४ वाजता अमय बसेश्वर यांच्या घरावर हा तुकडा पडला.
सुमारे ४ फूट लांब आणि १२ मिमी जाडीचा हा धातूचा तुकडा जबर आवाज करत छतावर आदळला. त्यामुळे छतावरील भिंतीचा काही भाग तुटून पडला. जोरदार आवाजामुळे घाबरून स्थानिक नागरिक घराबाहेर आले. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच उमरेड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सदर धातूचा तुकडा ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. हा तुकडा नेमका कुठून आणि कशामुळे पडला, याचा शोध लावण्यासाठी यंत्रणा कार्यरत झाली आहे.
या विचित्र घटनेने संपूर्ण शहरात उत्सुकता आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून वैज्ञानिक तपासासाठी संबंधित विभागाशी संपर्क केला जात आहे.









Comments are closed