India Morning News
पंढरपूर: आषाढी वारीच्या पवित्र पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर आणि परिसरात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा आषाढी यात्रेपूर्वी सात दिवस आणि यात्रेनंतर तीन दिवस, असे एकूण दहा दिवस मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जाहीर केला आहे. यापूर्वी केवळ तीन दिवस मांस विक्री बंदीचा निर्णय घेतला जात होता, मात्र यावर्षी हा कालावधी वाढवण्यात आला आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या या निर्णयाचे वारकऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे. यावेळी बोलताना गोरे म्हणाले, “आषाढी वारीच्या पावित्र्याला धक्का लागू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात पंढरपूर शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यांवरील मांस विक्रीची दुकाने कायमस्वरूपी बंद करून ठराविक ठिकाणीच मांस विक्रीला परवानगी दिली जाईल.”
हा निर्णय पंढरपूरातील पालखी मार्ग आणि शहर परिसरात लागू असेल. यामुळे आषाढी वारीच्या कालावधीत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना पवित्र वातावरणाचा लाभ घेता येणार आहे.










Comments are closed