Shopping cart

  • Home
  • News
  • आदित्य ठाकरेंची अटक टाळण्यासाठी हैद्राबादहून मांत्रिक आणला; रामदास कदम यांचा खळबळजनक आरोप

आदित्य ठाकरेंची अटक टाळण्यासाठी हैद्राबादहून मांत्रिक आणला; रामदास कदम यांचा खळबळजनक आरोप

June 25, 20251 Mins Read
50

India Morning News

Share News:
Share

मुंबई :- राज्याच्या राजकारणात सध्या ‘काळी जादू’ आणि ‘तांत्रिक प्रयोग’ यावरून चांगलंच वादंग पेटलं आहे. शिवसेनेचे माजी मंत्री आणि भाजप समर्थक नेते रामदास कदम यांनी थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रामदास कदम यांनी दावा केला की, दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक होऊ नये म्हणून हैद्राबादवरून एका मांत्रिकाला मुंबईत आणण्यात आलं.

रामदास कदम म्हणाले, “त्या मांत्रिकाला दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आलं. त्यानंतर खोपोलीजवळील एका ठिकाणी पाच दिवस तांत्रिक विधी करण्यात आले. यामागचा उद्देश केवळ आदित्य ठाकरेंना अटक होऊ न देणं हाच होता. या संपूर्ण प्रकरणात ठाकरे गटाचा एक खासदार सक्रिय होता. मी याचे फोटो, नाव, सगळे पुरावे देण्यास तयार आहे.”

याआधी ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री भरत गोगावले यांच्यावरही तांत्रिक विधी आणि काळी जादूचे आरोप करण्यात आले होते. मात्र यावेळी रामदास कदम यांनी तोच मुद्दा पलटवून थेट ठाकरे गटालाच लक्ष्य केलं आहे.

कदम पुढे म्हणाले, “मी महाराष्ट्राच्या विधानसभेचा विरोधी पक्षनेता राहिलो आहे. मी हवेत बोलत नाही, पुराव्यासकट बोलतो. ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’ हे आम्हाला माहीत आहे. भास्कर जाधवसारखे हवेत तलवार चालवत नाही.”

भास्कर जाधव संन्यास घ्यायलाच लावले जातील-
भास्कर जाधव यांच्यावर टीका करताना रामदास कदम म्हणाले, “गुहागरमधून अवघ्या 2200 मतांनी निवडून आलेला उमेदवार आता संन्यास घेणार म्हणतो. खरंतर संन्यास तो घेणार नाही, तर मतदारसंघातील जनता त्याला घ्यायला लावणार आहे. जेव्हा एकनाथ शिंदे भाजपासोबत गेले, तेव्हा भास्कर जाधव सुरतच्या बॉर्डरपर्यंत गेले होते. मात्र भाजपने त्यांना स्वीकारण्यास नकार दिला.”

“भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी मला व नारायण राणे यांच्यावर आरोप करत आहेत. अशा बिनबुडाचे आरोप केल्याने कोणी मोठं होत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

भास्कर जाधव यांचं प्रत्युत्तर-
दरम्यान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना म्हटलं, रामदास कदम काय बोलतात याला आम्ही फारसं महत्त्व देत नाही. त्यामुळे त्यांचं बोलणं गांभीर्याने घेण्याचीही गरज नाही.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share