Shopping cart

  • Home
  • News
  • सलमान खानच्या घरी शिरला अनोळखी व्यक्ती; सुरक्षा यंत्रणेला मोठं आव्हान

सलमान खानच्या घरी शिरला अनोळखी व्यक्ती; सुरक्षा यंत्रणेला मोठं आव्हान

May 22, 20250 Mins Read
80

India Morning News

Share News:
Share

मुंबई:सलमान खानवर वारंवार होणाऱ्या धमक्यांनंतर त्याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी गॅलक्सी अपार्टमेंटवर गोळीबार झाला होता, ज्याची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली होती.

नवीन माहिती अशी की, आता एक अनोळखी व्यक्ती सलमान खानच्या घरी शिरला. वांद्र्यातील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडला. पोलिसांची नजर चुकवत त्या व्यक्तीने घरात प्रवेश केला.

जितेंद्रकुमार सिंह असं संशयिताचं नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. एवढ्या कडेकोट बंदोबस्तातही घडलेला हा प्रकार सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतो.

सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींमुळे सलमान खानच्या घरात असा घातक शिरकाव होणं चिंतेचं कारण ठरत आहे. आता पोलीस यंत्रणेकडून अधिक तपास सुरू आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share