India Morning News
पंढरपूर: जून महिन्याची चाहूल लागताच महाराष्ट्राच्या मातीत भक्तीचा उत्साह संचारतो. टाळ-मृदंगाचा नाद, भगव्या पताकांचा फडफडाट आणि “माऊली… माऊली…”चा जयघोष करत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी निघतात. तेराव्या शतकापासून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापासून चालत आलेली आषाढी वारी ही भक्तीचा अखंड प्रवाह आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात:
“आषाढी निकट। आणि कार्तिकीचा हाट !!
पुरे दोन्हीच बाजार। न लगे आणीक व्यापार!”!!
या परंपरेला कधीही खंड पडलेला नाही. मात्र, मधल्या काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारने अनैसर्गिकरित्या सत्ता भोगताना वारीवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला. वारकऱ्यांना आपल्या हक्कासाठी न्यायालयात जावे लागले. पण पांडुरंगाच्या कृपेने त्यांचा सत्तेचा माज उतरला आणि विठ्ठलभक्त, वारकरी सेवक देवाभाऊ मुख्यमंत्री झाले.
देवाभाऊंची वारकऱ्यांसाठी काळजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांच्या सोयीसाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. पालखी मार्गावर आणि पंढरपूर शहरात सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये:
– पालखी तळ आणि मुक्काम:वॉटरप्रूफ मंडप आणि चार भक्त निवास बांधून वारकऱ्यांना अल्पदरात राहण्याची सोय.
– अनुदान: १० मानाच्या पालख्यांसोबत नोंदणीकृत दिंड्यांना २०,००० रुपयांचे अनुदान.
– टोल-फ्री वारी: यंदाची वारी टोल-मुक्त करण्यात आली.
– स्वच्छता आणि वैद्यकीय सेवा: पालखी मार्गावर स्वच्छतेसाठी विशेष काळजी आणि चरणसेवा उपक्रमांतर्गत ५,००० वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तत्पर.
– मद्य-मांस बंदी*: पंढरपूर आणि पालखी मार्गावरील गावांमध्ये मद्य आणि मांस विक्रीवर पूर्ण बंदी.
– भावनांचा आदर: आळंदी-मोशी परिसरातील प्रस्तावित कत्तलखान्याचे आरक्षण रद्द करून वारकऱ्यांच्या भावनांचा आदर.
वारकऱ्यांचा विश्वास
“माऊलीच्या कृपेने आणि देवाभाऊच्या साथीने आमची वारी सुखरूप होते,” असे वारकरी अभिमानाने सांगतात. पंढरीचा वारकरी आपल्या भक्तीच्या प्रवासात कधीही मागे हटत नाही. म्हणूनच म्हणतात:
“पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी!”
आषाढी वारीचा हा सोहळा केवळ धार्मिक उत्सव नसून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. पांडुरंगाच्या भेटीची ओढ आणि देवाभाऊंच्या सेवाभावाने ही वारी यंदा अधिकच सुखद आणि अविस्मरणीय होणार आहे.











Comments are closed