Shopping cart

  • Home
  • News
  • बिबवेवाडीत एमडीसह अटक झालेल्या आरोपीला अटींवर जामीन मंजूर

बिबवेवाडीत एमडीसह अटक झालेल्या आरोपीला अटींवर जामीन मंजूर

April 17, 20250 Mins Read
147

India Morning News

Share News:
Share

पुणे: बिबवेवाडी पोलीस ठाण्यात एमडी (अमली पदार्थ) प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी जुबेर ऊर्फ सुलतान लतिफ खान याला न्यायालयाने अटीं शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात जुबेर आणि स्वप्नील शिंदे या दोघांना गुप्त माहितीच्या आधारे गस्तीवरील पोलिसांनी अटक केली होती.

त्यांच्याकडील एमडी जप्त करून एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही आरोपींना येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले होते.जुबेरने यापूर्वी दोनदा जामीन अर्ज दाखल केले होते, परंतु दोन्ही वेळा ते फेटाळण्यात आले. तिसऱ्या प्रयत्नात त्याने ॲड. सुशांत तायडे यांच्यामार्फत न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात जामीन अर्ज सादर केला.

यावेळी त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याचा दावा करत, जप्त एमडी ही व्यावसायिक प्रमाणात (कमर्शियल क्वांटिटी) नसल्याचा युक्तिवाद ॲड. तायडे यांनी केला. सरकार पक्षाने या जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला. मात्र, सर्व बाजू ऐकून न्यायाधीश चव्हाण यांनी आरोपीला कठोर अटींवर जामीन मंजूर केला.

या खटल्यात आरोपीतर्फे ॲड. सुशांत तायडे यांनी युक्तिवाद केला, तर प्रज्ञा कांबळे तायडे, शुभांगी देवकुळे, जितू जोशी आणि दिनेश जाधव यांनी खटल्याचे कामकाज पाहिले.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share