Shopping cart

  • Home
  • News
  • अवैध देशी दारुची वाहतुकीत आरोपी अटक

अवैध देशी दारुची वाहतुकीत आरोपी अटक

June 10, 20251 Mins Read
463

India Morning News

Share News:
Share

कन्हान : – अवैध देशी दारुची वाहतुक करणाऱ्या आरोपीला कन्हान पोलीसांनी पकडुन त्याचा जवळुन ५३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .

शनिवार (दि.७) जुन रोजी सायंकाळी ६:३० वाजता च्या दरम्यान पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हान, हरिष सोनभद्रे, अमोल नागरे, जीवन विघे, मोहित झाडे , अश्विन गजभिये सह आदि पोलीस कर्मचारी अवैध धंध्यावर कारवाई करणे कामी परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि गांधी चौक कडुन युवक बजाज चेतक मोपेड दुचाकी वाहन. क्रमांक एम. एच.४०.सी.के.८०३० वर लाल रंगाचे बोरीत देशी दारु बाळगुन आंबेडकर चौक कडे येत आहे . अशा माहिती वरुन पोलीसांनी आंबेडकर चौक येथे नाकाबंदी केली असता चालकाला थांबवले . पोलीसांनी वाहनाची पाहणी केली असता एक लाल रंगाची प्लॅस्टीकची बोरी दिसुन आली बोरी खोलुन पाहिले असता बोरीमध्ये एकुण १०० प्लॅस्टीकचा निपा, देशी दारु, भिंगरी संत्रा, नं. 1 च्या सिलबंद प्रत्येकी १० एम. एल. चा एकुण ३५०० रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला . चालक शुभम नामदेव रंगारी (वय २२) रा.कन्हान याला दारु बाबत परवाना विचारले असता परवाना नसल्याचे सांगीतल्याने पोलीसांनी चालकास अटक करुन त्याचा जवळुन १०० प्लॅस्टीकचा देशी दारु निपा ३५०० रुपये आणि बजाज चेतक मोपेड वाहन किंमत ५०,००० रुपये असा एकुण ५३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share