India Morning News
मुंबई: गुजरातचे राज्यपाल अच्युत देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या नवीन राज्यपालपदाची शपथ घेतली. माजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी भारताचे उपराष्ट्रपती म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर देवव्रत यांना हे पद देण्यात आले.
शपथविधी सोहळा मुंबईतील राजभवन येथे पार पडला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांनी शपथविधी संपन्न केला. अच्युत देवव्रत यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली.
या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रिमंडळातील सदस्य, वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी हजेरी लावली.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देवव्रत यांच्याकडे गुजरातच्या राज्यपालपदासह महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.
अच्युत देवव्रत यांनी आपली पत्नी दर्शनादेवी यांच्यासह अहमदाबादहून तेजस एक्स्प्रेसने मुंबई गाठली. मुंबई सेंट्रल स्थानकावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच, रेल्वे पोलिस आणि मुंबई पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली.










Comments are closed