Shopping cart

  • Home
  • News
  • छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर कारवाई; चकमकीत सुरक्षा दलाकडून २० नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर कारवाई; चकमकीत सुरक्षा दलाकडून २० नक्षलवादी ठार

May 21, 20250 Mins Read
47

India Morning News

Share News:
Share

बिजापूर (छत्तीसगड) – छत्तीसगड राज्यातील नक्षलग्रस्त भागांमध्ये सुरक्षादलांनी मोठी मोहीम राबवत नक्षलवाद्यांवर जबरदस्त कारवाई केली आहे. अबूझमाड जंगल पट्ट्यात झालेल्या चकमकीत २० नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कारवाई अजून सुरूच असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही धडक मोहीम बिजापूर, नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांतील डीआरजी (डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड) च्या जवानांनी संयुक्तरीत्या हाती घेतली. जंगलातील गुप्त ठिकाणी लपलेले नक्षलवादी लक्ष्य करत सुरक्षादलांनी तिथे जोरदार कारवाई केली.

सूत्रांच्या माहितीनुसार, या चकमकीदरम्यान वसावा राजू नावाचा कुख्यात नक्षलवादी नेता ठार मारण्यात आल्याचं वृत्त आहे. वसावा राजू हा दंडकारण्य क्षेत्रातील नक्षल चळवळीतील एक मुख्य रणनीतीकार मानला जात होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो माड परिसरात सक्रिय होता आणि त्याच्या डोक्यावर तब्बल १ कोटी रुपयांचं बक्षीस सरकारने जाहीर केलं होतं.

सुरक्षादलांनी नक्षलवाद्यांच्या एका अत्यंत गोपनीय तळावर हल्ला चढवून ही कारवाई पार पाडली, ज्यामुळे नक्षल संघटनेला मोठा झटका बसला आहे. जर वसावा राजूचा मृत्यू अधिकृतपणे स्पष्ट झाला, तर ही कारवाई सुरक्षादलांसाठी एक मोठं यश ठरेल, असं मानलं जात आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share