Shopping cart

  • Home
  • News
  • अभिनेता वरुण धवन -जान्हवीचा डान्स फ्लोअरवर धुमाकूळ ; बिजुरिया गाणे प्रदर्शित

अभिनेता वरुण धवन -जान्हवीचा डान्स फ्लोअरवर धुमाकूळ ; बिजुरिया गाणे प्रदर्शित

September 4, 20251 Mins Read
33

India Morning News

Share News:
Share

मुंबई :  बॉलिवूड स्टार वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ या बहुचर्चित चित्रपटातील पहिले गाणं ‘बिजुरिया’ अखेर प्रदर्शित झालं आहे. १९९९ मध्ये गाजलेल्या सोनू निगमच्या हिट गाण्याचं हे नवं रिक्रिएशन असून, पुन्हा एकदा सोनू निगमनेच त्याला आपला दमदार आवाज दिला आहे. याला असीस कौरचीही साथ लाभली आहे.
तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात धडाकेबाज बीट्स आणि आकर्षक कोरिओग्राफीमुळे प्रेक्षकांना थिरकायला लावण्याची ताकद आहे. वरुण-जान्हवीची केमिस्ट्री आणि त्यांचे डान्स मूव्ह्ज गाण्याचं मुख्य आकर्षण ठरत आहेत.

गाण्यात जान्हवी कपूर पारंपरिक साडीतील हॉट लुकमध्ये चमकताना दिसते, तर वरुणचा डान्स स्टाईल प्रेक्षकांना भारावून टाकतो. याशिवाय, रोहित सराफ, सान्या मल्होत्रा आणि मनीष पॉल यांचाही झगमगता सहभाग गाण्याला अधिक रंगत आणतो.

शशांक खेतान दिग्दर्शित ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यात रोमान्स, कॉमेडी आणि म्युझिकचा धमाल संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share