Shopping cart

  • Home
  • Pune
  • पुण्यात ॲड. शहा यांच्या ‘श्रमण’ विधी कार्यालयाचे थाटात उद्घाटन

पुण्यात ॲड. शहा यांच्या ‘श्रमण’ विधी कार्यालयाचे थाटात उद्घाटन

June 1, 20251 Mins Read
196

India Morning News

Share News:
Share

पुणे: बारामतीचे सुप्रसिद्ध स्नेही श्री. अभय शहा यांचे चिरंजीव ॲड. अनुज शहा आणि ॲड. नेहा शहा यांच्या पुण्यातील शिवाजीनगर येथील ‘श्रमण’ या नवीन विधी कार्यालयाचे आज राज्यसभा खासदार सुनित्रा पवार यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. कायद्याच्या माध्यमातून समाजाला न्याय, समता आणि सन्मान मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास मान्यवरांची मांदियाळी उपस्थित होती.

या प्रसंगी माजी खासदार श्री. अमरजी साबळे, आदरणीय मीना काकी पवार, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री. कृष्णनाथ भोसले, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री. काकासाहेब जगताप, ॲड. अभयजी शहा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्याचे निरीक्षक सुरेश पालवे, चंदूकाका ज्वेलर्सचे संचालक अतुल शहा व सौ. संगीता शहा, पोपटजी ओसवाल, दिलीप सिंह यादव, किरण शहा यांच्यासह पुणे जिल्ह्यातील नामवंत विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पणदरे येथील शाळेचा माजी विद्यार्थी असलेले ॲड. अनुज यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करताना उपस्थितांनी या कार्यालयामार्फत समाजातील गरजू आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्याचा विश्वास व्यक्त केला. ॲड. अनुज आणि ॲड. नेहा यांच्या कायद्याविषयीच्या समर्पण, प्रामाणिकपणा, मेहनत आणि त्यांच्या आई-वडिलांचा खंबीर पाठिंबा यामुळे त्यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

नव्या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांच्या सेवांचा विस्तार होत असून, यानिमित्ताने त्यांना उपस्थित मान्यवरांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share