Shopping cart

  • Home
  • Pune
  • पक्षी धडकून एअर इंडियाच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग; प्रवाशांचे हाल, परतीचं उड्डाण रद्द

पक्षी धडकून एअर इंडियाच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग; प्रवाशांचे हाल, परतीचं उड्डाण रद्द

June 20, 20251 Mins Read
68

India Morning News

Share News:
Share

पुणे:- दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवासी विमानाला शुक्रवारी पक्षी धडकल्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि विमानाने सुरक्षितपणे पुणे विमानतळावर लँडिंग केलं. मात्र, इंजिनमध्ये पक्षी अडकल्याचे निदर्शनास आल्याने परतीचा “AI-2470” हा दिल्लीकडे जाणारा फ्लाइट रद्द करण्यात आला आहे.

विमानतळावर उतरल्यावर तांत्रिक तपासणीदरम्यान इंजिनमध्ये पक्षी अडकलेला आढळून आला. त्यामुळे तत्काळ उर्वरित सेवा थांबवत इंजिनीअरिंग विभागाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला असून, एअर इंडिया कंपनीने प्रवाशांच्या सोयीसाठी राहण्याची, जेवणाची व पुढील प्रवासाची व्यवस्था केली आहे. इच्छुक प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत मिळतील किंवा पुढील प्रवास मोफत रीशेड्युल करता येणार आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने देखभाल व तांत्रिक अडचणींमुळे एकूण आठ उड्डाणे रद्द केली असून त्यात चार आंतरराष्ट्रीय सेवांचा समावेश आहे. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहचवण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत.

तसेच, २१ जून ते १५ जुलै दरम्यान आठवड्याला ३८ आंतरराष्ट्रीय उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. तीन परदेशी मार्गांवरील उड्डाणेही या काळात बंद राहणार आहेत. अलीकडील अपघातांनंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तपासण्या अधिक काटेकोर करण्यात आल्या असून, त्यामुळे ही निर्णय घेण्यात आले आहेत.

वारंवार होणाऱ्या विमानसेवा अडचणींमुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. तरीही एअर इंडियाने सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होत आहे. भविष्यात अधिक पारदर्शक व वेळेवर सेवा मिळण्याची अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share