Shopping cart

  • Home
  • Politics
  • एअर इंडिया विमान दुर्घटना: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यासह २५५ जणांचा मृत्यू

एअर इंडिया विमान दुर्घटना: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यासह २५५ जणांचा मृत्यू

June 12, 20251 Mins Read
259

India Morning News

Share News:
Share

अहमदाबाद: अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI171 या प्रवासी विमानाने आज दुपारी १.३१ वाजता उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत मेघानीनगर येथील नागरी वस्तीत कोसळले. या भीषण दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यासह २५५ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

या विमानात १० क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये १६९ भारतीय आणि ६१ परदेशी नागरिकांचा समावेश होता, त्यापैकी ५३ प्रवासी ब्रिटनचे होते. विमान ७०० फुटांवरून खाली कोसळले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.

विजय रूपाणी यांचा राजकीय प्रवास

विजय रूपाणी यांचा राजकीय प्रवास अत्यंत प्रेरणादायी होता. शिक्षण घेत असतानाच ते भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विद्यार्थी संघटनेत सक्रिय झाले. १९७१ मध्ये त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंध आला. १९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात ते ११ महिने तुरुंगात होते. १९९६-९७ मध्ये ते राजकोटचे महापौर होते, तर १९९८ मध्ये त्यांची भाजपच्या गुजरात युनिटचे सचिव म्हणून नियुक्ती झाली. २००६ मध्ये ते गुजरात टुरिझमचे चेअरमन बनले आणि २००६ ते २०१२ या कालावधीत राज्यसभेचे सदस्य होते. २०१६ ते २०२१ या काळात त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली.

दुर्घटनेची चौकशी सुरू

या दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एअर इंडिया आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने बचावकार्य सुरू केले असून, दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे. ही घटना देशासाठी आणि विशेषत: गुजरातसाठी मोठा धक्का मानली जात आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share