Shopping cart

  • Home
  • News
  • पुण्यातील भूमि अभिलेख विभागाचे उप अधीक्षक अमरसिंह पाटील निलंबित

पुण्यातील भूमि अभिलेख विभागाचे उप अधीक्षक अमरसिंह पाटील निलंबित

April 25, 20251 Mins Read
40

India Morning News

Share News:
Share

Sub heading -येरवडा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल

मुंबई: पुणे हवेली येथील भूमि अभिलेख विभागाचे उप अधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील यांच्याविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर त्वरित कार्यवाही करत पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे.

अमरसिंह पाटील यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अंतर्गत तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम ३०८(२), १९८ व २०१ प्रमाणे कारवाई करण्यात आले आहे. याबरोबरच, त्यांच्या विरोधातील तक्रारींनुसार सखोल चौकशी करण्यासाठी विभागाने विशेष समिती स्थापन केली आहे.

या प्रकरणाच्या गंभीरतेचा विचार करता, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अंतर्गत पाटील यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. पुढील आदेश होईपर्यंत ते सरकारी सेवेतून निलंबित असतील. निलंबनाच्या कालावधीत त्यांचे मुख्यालय लोहारा, जि. धाराशिव येथील उप अधीक्षक कार्यालय ठरवले असून, तेथे जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख कार्यालयाच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू शकणार नाहीत, असा आदेश देण्यात आले आहे.

या कारवाईमुळे महसूल आणि भूमि अभिलेख विभागात खळबळ उडाली आहे. शासनाने भ्रष्टाचाराविरुद्ध घेतलेल्या कठोर निर्णयाने प्रशासनातील पारदर्शकतेच्या दृष्टीने एक ठळक संदेश दिला आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share