Shopping cart

  • Home
  • News
  • मराठमोळ्या शेतकऱ्याची अफलातून कामगिरी; तब्बल ३ किलोचा आंबा, नाव ठेवलं ‘शरद मँगो’

मराठमोळ्या शेतकऱ्याची अफलातून कामगिरी; तब्बल ३ किलोचा आंबा, नाव ठेवलं ‘शरद मँगो’

May 2, 20251 Mins Read
46

India Morning News

Share News:
Share

सोलापूर: सध्या आंब्याचा हंगाम सुरू असतानाच पंढरपूरच्या एका शेतकऱ्याने एक आगळावेगळं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे. दत्तात्रय घाडगे या नाविन्यपूर्ण शेतकऱ्याने आपल्या शेतात तब्बल ३ किलो वजनाचा आंबा पिकवण्याचा अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे. विशेष म्हणजे, या राकट आंब्याचं नामकरण त्यांनी ‘शरद मँगो’ असं केलं असून, या फळाला पेटंट मिळालं आहे.

आंब्याचं नाव ‘शरद मँगो’ का?
हा नाविन्यपूर्ण आंबा १९९२ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या काळात सुरू झालेल्या फळबाग योजनेच्या प्रेरणेने विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे या आंब्याला शरद पवार यांच्या संमतीने ‘शरद मँगो’ असं नाव देण्यात आलं आहे. हा आंबा पाहण्यासाठी सोलापूर आणि परिसरातील अनेक जण पंढरपूरमधील घाडगे यांच्या बागेत येत आहेत.

प्रयोगशील शेतीचा उत्कृष्ट नमुना-
घाडगे यांनी ८ एकर बागायत क्षेत्रात १७ विविध प्रकारच्या आंब्याच्या जाती लावल्या असून, त्यात ग्राफ्टिंगच्या माध्यमातून हे नवीन फळ निर्माण केलं आहे. या प्रयोगासाठी त्यांनी राज्य सरकारच्या फळबाग योजनेचा लाभ घेतला आहे. ‘शरद मँगो’ हे फळ केवळ वजनात भारी नाही, तर त्यामागे असलेली संशोधन आणि प्रयत्नांची कथा अधिक मोठी आहे.

शरद मँगो’ आणि ‘संत सावता माळी’ पेटंट मिळवलेले दोन खास प्रकार-

घाडगे यांनी फळोत्पादनात केलेल्या प्रयोगातून फक्त ‘शरद मँगो’ नव्हे, तर ‘संत सावता माळी’ नावाचाही एक वेगळा आंबा विकसित केला असून, यालाही पेटंट मिळाले आहे. त्यांच्या मते, जर हे पीक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेतले गेले, तर शेतकऱ्यांना एकरी २५ लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.

शेतीतून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल-
घाडगे म्हणतात, देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही गंभीर समस्या आहे. अशा प्रयोगशील शेतीतून उत्पन्नवाढ होऊन ही समस्या कमी करता येईल. ‘शरद मँगो’ ही केवळ फळाची जात नाही, तर शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाची नवी दिशा आहे.

 

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share