Shopping cart

  • Home
  • News
  • पहलगाम येथे झालेल्या घटने विरोधात अमरावती बंद.

पहलगाम येथे झालेल्या घटने विरोधात अमरावती बंद.

April 25, 20251 Mins Read
54

India Morning News

Share News:
Share

विश्व हिंदु परिषदेचे आव्हान अमरावती येथे ‘ हिंदु बांधव एकत्र ‘

हिंदू नव्हे; भारतीय म्हणुन एकत्र या! ‘ अमरावतीकरांची हाक…

अमरावती : पहलगाम येथे झालेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे.’ धर्म विचारून आतंकवांद्यानी गोळ्या झाडल्या ‘ हे वृत्त मन विषण्ण करणारे असुन; सर्व धर्मियांनी देशभर या घटनेचा निषेध केला आहे. राज्य व देश पातळीवर विविध ठिकाणी राजकीय व सामाजिक बांधिलकी असलेल्या लोकांनी एकत्र येऊन वेग~वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे.
अमरावती येथे सुद्धा हिंदुत्ववादी संघटनांनी राजकमल चौक, अमरावती येथे सर्वांना एकत्र येण्याचे आव्हान केले होते. कश्मिर येथिल पहलगाम हल्ल्यात गोळीबार होऊन मृत पावलेल्या लोकांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.तसेच यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून; लोकांनी या घटनेचा निषेध केला.

शहरात सर्वत्र ठीक~ठिकाणी श्रध्दांजलीचे फलक लावण्यात आले होते. बऱ्याच लघु उद्योगजक व व्यावसायिकांनी आपले यावेळी प्रतिष्ठान बंद ठेऊन; विश्व हिंदु परिषदेच्या आव्हानाला प्रतिसाद देत कडेकोट बंद ठेवला. व पहलगाम येथे झालेल्या दुःखद घटने विरोधात अमरावती येथे बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share