Shopping cart

  • Home
  • Politics
  • नागपुरात ‘विकसित भारताचा अमृतकाल’ जनजागृती मोहिमेला सुरुवात; भाजपा तर्फे १४ उपक्रम जाहीर

नागपुरात ‘विकसित भारताचा अमृतकाल’ जनजागृती मोहिमेला सुरुवात; भाजपा तर्फे १४ उपक्रम जाहीर

June 10, 20251 Mins Read
47

India Morning News

Share News:
Share

मोदी सरकारच्या ११ वर्षांतील यशोयात्रा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा भाजपचा संकल्प

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ११ वर्षांमध्ये देशाच्या विकासाला नवे वळण दिले. गरिबी हटवण्यापासून ते शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल भारत यासारख्या क्षेत्रात ऐतिहासिक बदल घडवण्यात आले. या यशाचा आढावा नागपूरकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप नागपूर शहराने ‘विकसित भारताचा अमृतकाल’ या अभियानाअंतर्गत १४ विशेष जनजागृती उपक्रमांची घोषणा केली आहे.

या अभियानाची माहिती देण्यासाठी आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. ‘सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचे ११ वर्ष बेमिसाल’ या घोषवाक्याखाली हे अभियान १२ जूनपासून शहरात सुरू होणार आहे.

घोषित १४ महत्त्वाचे उपक्रम :
शुभारंभ पत्रकार परिषद – १२ जून रोजी दुपारी १२ वाजता सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उद्घाटन.

१००० जनसंवाद सभा – नागपूरच्या सहा विधानसभा क्षेत्रांतील मंडळांमध्ये नागरिकांशी थेट संवाद.

२० संकल्प सभा – केंद्र व राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती देणाऱ्या भव्य सभा.

विधिज्ञ परिषद – कायदा व न्यायव्यवस्थेतील सुधारांवर वकिलांशी चर्चा.

अर्थतज्ज्ञ संवाद – सीए, सीएस आणि वित्ततज्ज्ञांसोबत केंद्राच्या आर्थिक निर्णयांवर विचारविनिमय.

शिक्षक परिषद – शिक्षण क्षेत्रातील धोरणांवर शिक्षकांशी संवाद सत्र.

युवक उद्योजक सन्मान – नव्या पिढीतील उद्योजकांचा गौरव आणि संवाद.

डिजिटल स्पर्धा – रील्स, ब्लॉग्स आणि व्हिडीओ स्वरूपात स्पर्धा; नोंदणी १२ ते २४ जूनदरम्यान.

चित्रप्रदर्शन – केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या कार्याचा दस्तावेज म्हणून संपूर्ण शहरात प्रदर्शने.

योजना शिबिरे – सरकारी योजनांचे प्रत्यक्ष लाभ पोहोचवणारी शिबिरे.

सोशल मीडिया चर्चासत्र – विविध विषयांवर ऑनलाइन संवाद.

चौपाळ संवाद – मॉल्स, चौक आणि उद्यानांमध्ये जनतेशी थेट संपर्क.

विशेष संवाद सत्र – २१ जून रोजी सुरेश भट सभागृहात मा. नितीन गडकरी यांच्याशी संवाद; प्रमुख उपस्थिती डॉ. उदय निरगुडकर.

‘घर चलो’ अभियान – माहितीपत्रकांद्वारे प्रत्येक घरात सरकारच्या निर्णयांची माहिती. भाजपचा उद्देश स्पष्ट –

या १४ उपक्रमांच्या माध्यमातून नागपूर शहरातील प्रत्येक नागरिकाला केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या विकासयात्रेची माहिती देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. भाजपच्या मते, अमृतकाल ही केवळ विकासाची संकल्पना नसून आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा आरंभ आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share