India Morning News
कांचन नितीन गडकरीं करताहेत ऑरगॅनिक शेती
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धापेवाडा येथील शेतामध्ये त्यांच्या पत्नी कांचन यांनी केलेल्या अनोख्या प्रयोगामुळे कांद्याचे भरगोस उत्पादन आले असून एक एक कांदा ८०० ते १ किलो वजनाचा आहे. ही माहिती खुद्द नितीन गडकरी यांनी त्यांनी व्हिडीओ पोस्ट करून दिली आहे. विशेष म्हणजे, गडकरी केवळ ऑरगॅनिक शेतीची माहिती देत नाहीत तर त्याची अमलबजावणीही करतात.
कांचन गडकरी या मागील काही वर्षांपासून सेंद्रीय शेतीवर विशेष भर देत आहेत. गडकरी यांनी व्हिडीओमधून या कांद्याच्या बिया कुठून आणल्या, काय तंत्रज्ञान वापरले याची माहिती दिली आहे. गडकरी म्हणाले, कांद्याचे बीज युरोपातील नेदरलँडहून आणले आहे. सेमिनीस कंपनीचे अडीच किलो बियाणे एका एकर जमिनीत पेरले. भारतातील कांदा लागवडीप्रमाणे त्याचीही प्रक्रिया करून ४५ दिवस नर्सरी तयार करण्यात आली. यानंतर वाढलेली रोपे दुसरीकडे लावण्यात आली. अशी जवळपास २४ हजार कांद्याची रोपे लावण्यात आली होती. एका कांद्याचे वजन ४०० ग्रॅम ते ८००-१००० ग्रॅम एवढे भरले. एका एकरातून गडकरींनी १२ ते १३ टन उत्पादन घेतले आहे
डबल ड्रिप इरिगेशन करण्यात आले. या मातीत बायो ऑर्गॅनिक फर्टिलायझर मिक्स करण्यात आले होते. यानंतर या बेडवर मल्चिंग पेपर टाकण्यात आला, त्याला होल मारून रोपे लावण्यात आली. या काळात सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली. या काळात ७ ते १० टक्के मृत्युदर राहिला, जो शेतीच्या प्रमाणात कमी होता. अशी शेती जर कोणी शेतकरी सेंद्रीय शेती करणार असेल तर आम्ही त्याला पूर्ण मदत करू, असे गडकरी यांनी सांगितले






Comments are closed