India Morning News
पुणे:महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आणि पुणे पुस्तक महोत्सव व वंदे मातरम् सार्धशती जयंती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यलढ्यातील चैतन्य ऊर्जेचा ज्वलंत प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कालजयी कादंबरीवर आधारित संगीत नाटक ‘आनंदमठ’ सादर होणार असून, मिलिंद सबनीस लिखित ‘ध्यास वंदे मातरम्’ या ग्रंथाचा विशेष प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.

हा कार्यक्रम शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४.३० वाजता पुण्यातील प्रतिष्ठित बालगंधर्व रंगमंदिर येथे होईल. मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री मा. आशिष शेलार उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मा. मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांत (दादा) पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे.
‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीचा मंत्र बनले होते. या ऐतिहासिक वारशाला पुन्हा उजाळा देणारा हा कार्यक्रम पुणेकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे.या आयोजक राजेश पांडे यांनी सर्व नागरिकांना उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आवाहन केले आहे. प्रवेश विनामूल्य असून, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असेल.











