India Morning News
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अंगर नगरपंचायतच्या अध्यक्ष तसेच सदस्यपदाच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील सर्व कार्यवाही होणार असून, याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अधिकृत आदेश जारी केले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अनगर नगरपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमात काही तांत्रिक व प्रशासकीय कारणास्तव बदल करणे आवश्यक ठरले. त्यामुळे यापूर्वी जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला असून, लवकरच राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर नवीन तारखा जाहीर केल्या जातील. सुधारित कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, छाननी, उमेदवारी माघार आणि मतदान अशा सर्व टप्प्यांची नव्याने घोषणा होईल.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि कायद्याच्या चौकटीत पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित उमेदवार आणि राजकीय पक्षांना सुधारित वेळापत्रकाची पूर्वसूचना देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


