India Morning News
नागपूर,दि. 06 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून
सदर महामंडळाच्या योजना प्रामुख्याने मराठा प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकासाठी आहे. या प्रवर्गातील तरुण, तरुणीना उद्योजक होण्यास प्रोत्साहन देऊन त्यांचे सबलीकरण करण्यासाठी महामंडळची व्याज परतावा योजना महत्वाची आहे. या योजनांच्या सहाय्याकरीता महामंडळाचे मुंबई मुख्यालय व जिल्हानिहाय जिल्हा समन्वयकांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे कोणत्याही प्रसार माध्यमाद्वारे / फेसबुक/ व्हाट्सअँप/ खाजगी व्यक्ती / संस्थेच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा समन्वयक प्रियंका उ.कपले यांनी केले आहे.
अधिक माहिती करिता नवीन प्रशासकिय इमारत क्र. २. दुसरा माळा, (विंग ए), सिव्हील लाईन्स, नागपूर येथे संपर्क साधावा. माहिती udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
आहे.







Comments are closed