India Morning News
विद्यार्थ्यांनो भविष्यातील आव्हानांसाठी तयार राहा – श्री प्रसाद धारप
लिबरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित हडस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या वर्ग पाच ते अकराच्या विद्यार्थ्यांचा सत्र २०२४- २५ चा वार्षिक निकाल महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जाहिर करण्यात आला.
वर्षभर शर्थीचे प्रयत्न करून पुढल्या वर्गात प्रवेश करण्याचा प्रसंगानुभव विद्यार्थ्यांनी घेतला; खर तर निकाल हा विद्यार्थ्यांचाच नसून मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सुद्धा असतो. विद्यार्थ्यांसह शिक्षकांना देखील आत्मपरीक्षणाची संधी निकालाच्या माध्यमातून मिळत असते.
विद्यालयातील परीक्षा विभाग द्वारा आयोजित वार्षिक निकालोत्सव -२०२५ प्रसंगी हडस हायस्कूल नागपूर अलूमीनी असोसिएशनचे अध्यक्ष श्री किरण दुरुगकर सर , श्री प्रसाद धारप सर , कोषाध्यक्ष व अन्य सन्माननीय पदाधिकारी श्रीयुत पैठणकर सर , आणि दैनिक तरुण भारतचे ज्येष्ठ वार्ताहार, श्री किरण राजदेरकर सर उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. याशिवाय मागील अनेक वर्षांपासून हडस हायस्कूल मध्ये शिकणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी असोसिएशन द्वारा राबविल्या जाणाऱ्या उत्कर्ष योजनेची माहिती असोसिएशनच्या वतीने श्री पैठणकर सरांनी पालकांना व विद्यार्थ्यांना दिली.
या सर्व सन्माननीय अतिथींच्या हातून विद्यार्थ्यांना बक्षीस प्रदान करून त्यांचा उत्साह द्विगुणीत केला गेला; विद्यार्थ्यांसह पालक सुद्धा लेकरांचे कौतुक पाहण्यासाठी उपस्थित होते.
प्रत्येक विद्यार्थी हा एकमेवाद्वितीय असतो कोणी अभ्यासात तर कोणी अवांतर कला – कौशल्यात प्राविण्य मिळवतो तेव्हा मिळालेल्या यशाने हरखून न जाता व अपयशाने खचून न जाता पुढील शैक्षणिक प्रवास आनंदाने पूर्ण करावा असे आवाहन पर्यवेक्षक श्री. अजय लाबडे यांनी केले.
अतिशय कमी वेळामध्ये आकारिक व संकलित मूल्यमापनासह प्रयत्नांची पराकाष्टा करून शिक्षकांनी आपले वर्गकार्य पूर्ण केले. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राबविलेल्या विविध परीक्षांचा एकत्रित निकाल असल्याचे परीक्षा विभाग प्रमुख डॉक्टर प्रज्ञा देशपांडे यांनी नमूद केले.
राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्र सैनिकांनी मिळवलेले घवघवीत यश कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शितल मोहोड यांनी तर डॉ.सुशील वंजारी यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.








Comments are closed