Shopping cart

  • Home
  • News
  • बीड जिल्ह्यात पुन्हा रक्तरंजित घटना; भाजप कार्यकर्त्याची भरदुपारी हत्या

बीड जिल्ह्यात पुन्हा रक्तरंजित घटना; भाजप कार्यकर्त्याची भरदुपारी हत्या

April 15, 20250 Mins Read
52

India Morning News

Share News:
Share

बीड:बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना घडली आहे. माजलगाव शहरात भरदुपारी भाजपच्या एका स्थानिक कार्यकर्त्याची धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना भाजपच्या तालुकाध्यक्षांच्या कार्यालयाजवळ घडल्याने, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव बाबासाहेब आगे असून ते किट्टी आडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आणि भाजपचे सक्रिय विस्तारक होते. तर आरोपीचे नाव नारायण शंकर फपाळ असे आहे.

बाबासाहेब आगे आणि नारायण फपाळ यांच्यात काही आर्थिक व्यवहारावरून वाद निर्माण झाला होता. मात्र या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

माहितीनुसार, मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ते भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांची भेट घेण्यासाठी स्वामी समर्थ मंदिराजवळील कार्यालयात आले होते.तेथेच आधीपासून थांबलेल्या आरोपी नारायण शंकर फपाळ याने शर्टच्या मागे लपवलेला कोयता काढून आगे यांच्यावर एकापाठोपाठ एक असे वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share