Shopping cart

  • Home
  • Sports
  • आशिया कप 2025: भारताची पाकिस्तानवर दमदार मात, पुढच्या फेरीत स्थान पक्के

आशिया कप 2025: भारताची पाकिस्तानवर दमदार मात, पुढच्या फेरीत स्थान पक्के

September 15, 20251 Mins Read
259

India Morning News

Share News:
Share

दुबई: आशिया कप 2025 च्या बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात भारताने पाकिस्तानवर सहज विजय मिळवत पुढील फेरीतील आपले स्थान निश्चित केले. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या थरारक सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत चाहत्यांना उत्साहात बुडवले.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 128 धावा केल्या आणि भारताने 131 धावा 3 विकेट सोळाव्या षटकामध्ये मध्ये पूर्ण केले आहेत. सर्वाधिक रन सूर्यकुमार यादवने केले आहे. या मॅचमुळे देशभरात पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारताच्या या विजयाने आशिया कपमधील त्यांचा आत्मविश्वास वाढला असून, पुढील सामन्यांमध्येही त्यांच्याकडून अशाच आक्रमक खेळाची अपेक्षा आहे. दुसरीकडे, पाकिस्तानला पुढील फेरीत टिकण्यासाठी आता कठीण आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share