Shopping cart

  • Home
  • News
  • आता तरी राहुल गांधींचं डोकं ताळ्यावर येईल- चंद्रशेखर बावनकुळे

आता तरी राहुल गांधींचं डोकं ताळ्यावर येईल- चंद्रशेखर बावनकुळे

April 25, 20251 Mins Read
53

India Morning News

Share News:
Share
आता तरी राहुल गांधींचं डोकं ताळ्यावर येईल- चंद्रशेखर बावनकुळे
सावरकरविरोधी वक्तव्यावर सुप्रीम कोर्टाचा दणका, ही राष्ट्रभावनेचीच प्रतिक्रिया
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची राहुल गांधींवर टीका
शब्द शस्त्र असतात, विवेकानं वापरा, चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून काय म्हटलं पाहुयात
भारतीय स्वातंत्र्याच्या रणभूमीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काळ्या पाण्याच्या अंधाऱ्या काळकोठडीतून विचारांचा प्रकाश दिला, त्या महापुरुषांवर राहुल गांधींनी ‘ब्रिटिशांचा सेवक’ अशी टीका करत आपल्या वैचारिक दारिद्र्याची आणि इतिहासद्रोहाची पातळी दाखवून दिली होती.
आज सुप्रीम कोर्टानं जी झणझणीत कानउघाडणी केली ती योग्यच! ही फटकार केवळ न्यायालयीन नाही तर राष्ट्रभावनेचीच प्रतिक्रिया आहे. त्यामुळे आता तरी त्यांचं डोकं ताळ्यावर येईल. अशी अपेक्षा आहे.
राहुल गांधींनी आणखी एक लक्षात घ्यावं की, शब्द हे शस्त्र असतात आणि शस्त्र हाताळताना विवेक हवा, अन्यथा ते तुम्हाला जखमी केल्याशिवाय राहत नाहीत.
Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share