Shopping cart

  • Home
  • News
  • जिल्ह्यातुन हद्दपार अविनाश सहारे कन्हान शहरात वास्तव्य

जिल्ह्यातुन हद्दपार अविनाश सहारे कन्हान शहरात वास्तव्य

June 27, 20251 Mins Read
35

India Morning News

Share News:
Share

कन्हान : – नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा आदेशानुसार पो.स्टे. कन्हान हद्दीत कोंबींग ऑपरेशन करताना जिल्ह्यातुन हद्दपार अविनाश सहारे हा कन्हान येथे स्वत:च्या घरी वास्तव करतांना पोलीसांनी पकडुन त्यांचा विरूध्द गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली .

कन्हान शहरातील तुकाराम नगर येथील रहिवासी नागपुर जिल्ह्यातुन हद्दापार करण्यात आलेला अविनाश उर्फ लंगडा सुखचंद सहारे हा आपल्या राहत्या घरी वास्तव्य करित आहे . अशा गुप्त माहिती वरुन पोलीसांनी अविनाश सहारे याचा घरासमोर जाऊन आवाज दिला‌ असता सहारे हा घरातुन बाहेर आला . नागपुर जिल्ह्यातुन एक वर्षांकरिता हद्दपार असतांना नागपुर जिल्ह्यात येण्याची परवानगी घेतली काय ? असे विचारले तर त्याने कुठलीही परवानगी घेतली नसल्याने सांगितले . अंगझडती घेतली असता कुठलीही मौल्यवान किंवा संशयास्पद वस्तु मिळुन आली . पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन त्यांचा विरूध्द गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली .

सदरची कारवाई पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात सपोनि राहुल चव्हाण, पोउपनि एकनाथ राठौड, पो.हवा.हरिष सोनभद्रे, पो.ना अमोल नागरे, पो.शि. जिवन विघे असे मिळुन कार्यवाही यशस्वीरीत्या पार पाडली .

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share