Shopping cart

  • Home
  • News
  • बच्चू कडू पाचव्या दिवशी उपोषणावर ठाम; प्रकृतीत ढासळली , कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण

बच्चू कडू पाचव्या दिवशी उपोषणावर ठाम; प्रकृतीत ढासळली , कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण

June 12, 20250 Mins Read
63

India Morning News

Share News:
Share

अमरावती – प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन आज पाचव्या दिवशी प्रवेशले आहे. सलग पाच दिवस अन्न न घेतल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय घसरण झाली असून, आज सकाळी त्यांना उलट्या झाल्या. आता त्यांना उठून बसणेही कठीण झाले आहे.

उपोषणाचा शारीरिक परिणाम स्पष्ट
अन्नत्यागामुळे त्यांच्या शरीरातील शक्ती झपाट्याने कमी होत आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत त्यांचे वजन चार किलोने घटले आहे. त्यांना सकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानंतर वैद्यकीय पथक तात्काळ उपस्थित झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबत आजच महत्त्वाची चर्चा
दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बच्चू कडू यांची ऑनलाईन बैठक होणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी तारीख या बैठकीत ठरल्यासच आंदोलन मागे घेतले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या चर्चेकडे राज्यभरातून लक्ष लागले आहे.

शेतकरी नेत्यांचा पाठिंबा वाढतोय
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला इतर नेत्यांचा पाठिंबा मिळू लागला आहे. राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांनी कडूंना भेट देत समर्थन दर्शवले आहे. तसेच प्रहार संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपोषण स्थळी पोहोचून पाठिंबा देत आहेत.

बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –

शेतमालाला किमान आधारभूत दरावर २०% अनुदान मिळावे

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ₹१० लाख मदत व पूर्ण कर्जमुक्ती

दिव्यांग व विधवा महिलांना दरमहा ₹६००० मानधन

ग्रामीण भागासाठी शहरासारखे घरकुल निकष आणि किमान ₹५ लाख अनुदान

धनगर समाजासाठी तत्काळ आरक्षण

बेरोजगार धनगर तरुणांना १३% सरकारी नोकरी आरक्षण

प्रशासनाकडून सतत संपर्क
प्रशासनाकडून त्यांच्या प्रकृतीबाबत सातत्याने निरीक्षण ठेवले जात असून, आंदोलकांना अधिक त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र बच्चू कडू आंदोलन थांबवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share