India Morning News
नागपूर :-
मुस्लीम बांधवांची बकरी ईद अर्थात ‘ईद-उल-अज्हा’ शनिवारी (दि. ७) शहर – जिल्ह्यात साजरी होत आहे. सकाळी ९.३० वाजता शहरातील मोमीनपुरा परिसरात सामुदायिक नमाजपठण पार पडले. त्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.
बकरी ईद हा मुस्लीम समाजासाठी त्याग व बलिदानाचे प्रतीक मानला जाणारा महत्त्वाचा सण आहे. इस्लामिक पंचांगानुसार जिलहज्ज महिन्याच्या दहाव्या दिवशी तो साजरा केला जातो. शनिवार (दि.7) रोजी ईदच्या दिवशी सकाळी सामूहिक नमाजपठणानंतर जनावरांची कुर्बानी देण्यात आली.
ईदच्या पार्श्वभूमीवी मुस्लीम बांधवांनी नवे कपडे खरेदी केले तर लहान मुलांमध्ये ईदचा उत्साह अधिक पाहावयास मिळतो आहे.
धार्मिकदृष्ट्या बकरी ईदला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रेषित हजरत इब्राहिम व त्यांचे पुत्र हजरत इस्माईल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बकरी ईदपासून पुढे सलग तीन दिवस ‘कुर्बानी’ करण्याची प्रथा आहे. याचदरम्यान हज यात्राही पूर्ण केली जाते.










Comments are closed