Shopping cart

  • Home
  • News
  • लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा: अनुदानासोबत महिलांना मिळणार ‘रुपे कार्ड’!

लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा: अनुदानासोबत महिलांना मिळणार ‘रुपे कार्ड’!

May 9, 20251 Mins Read
48

India Morning News

Share News:
Share

राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच घोषणा केली आहे की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अडीच कोटी महिलांना आता दरमहा 1500 रुपये अनुदानासोबतच ‘रुपे कार्ड’ देखील वितरित करण्यात येणार आहे.

‘रुपे कार्ड’द्वारे आर्थिक स्वावलंबनाला चालना-
महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे झालेल्या जिल्हा परिषद आयोजित कार्यक्रमात मंत्री तटकरे बोलत होत्या. बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून हे ‘रुपे कार्ड’ महिलांना वितरित करण्यात येणार आहे. या कार्डाचा वापर केवळ गरजेच्या आणि नियमबद्ध ठिकाणी करता येईल. मद्य दुकानं आणि पानटपऱ्यांवर या कार्डाचा वापर करता येणार नाही.

नाशिक विमानतळावर ‘ई-पिंक रिक्षा’ सेवा लवकरच-
या कार्यक्रमात महिलांसाठीच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत महिलांना ई-पिंक रिक्षाचे वितरण करण्यात आले. मंत्री तटकरे यांनी जाहीर केले की, लवकरच नाशिक शहरातील विमानतळावर पिंक रिक्षाची सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. या उपक्रमामुळे महिलांच्या उपजीविकेला हातभार लागणार आहे. या कार्यक्रमात छगन भुजबळ, आमदार हिरामण खोसकर आणि महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share