Shopping cart

  • Home
  • News
  • मोठी बातमी! इस्रायलचा इराणवर हल्ला: अण्वस्त्र केंद्र उद्ध्वस्त, तिसऱ्या महायुद्धाची भीती

मोठी बातमी! इस्रायलचा इराणवर हल्ला: अण्वस्त्र केंद्र उद्ध्वस्त, तिसऱ्या महायुद्धाची भीती

June 13, 20251 Mins Read
122

India Morning News

Share News:
Share

तेहरान : इस्रायलने इराणवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करून जागतिक तणावात भर घातली आहे. या हल्ल्याने संपूर्ण तेहरान हादरले असून, इराणची अण्वस्त्र केंद्रे उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले की, ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत इराणच्या अणुशास्त्रज्ञ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमांना लक्ष्य करण्यात आले. हल्ल्यानंतर इस्रायलने आपला हवाई हद्द बंद केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलने इराणवर हा अचानक हल्ला केला. इराण आपला अणुकार्यक्रम जलद गतीने पूर्ण करत असल्याच्या बातम्यांमुळे इस्रायलने ही कारवाई केल्याचे मानले जाते. इस्रायली हवाई दलाच्या डझनभर लढाऊ विमानांनी हल्ल्याचा पहिला टप्पा पूर्ण केला. यात इराणच्या अण्वस्त्र केंद्रांसह मोक्याची लष्करी तळे उद्ध्वस्त झाली.

इराणला मोठा झटका

या हल्ल्यात इराणच्या दोन प्रमुख अणुशास्त्रज्ञ मोहम्मद मेहदी आणि फेरायदौन अब्बासी यांच्यासह रिव्होल्युशनरी गार्ड्सचे कमांडर होसैन सलामी यांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या अणुकार्यक्रमासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. इस्रायलने भारतीय शैलीतील अचूक हल्ल्यांचा वापर करत मोक्याच्या ठिकाणांना लक्ष्य केले.

जागतिक चिंता वाढली

इराण अण्वस्त्र निर्मितीच्या जवळ असल्याने त्यांच्या हातातील विनाशकारी शस्त्रसाठा इस्रायल आणि जगासाठी धोकादायक ठरू शकतो, असे इस्रायलचे म्हणणे आहे. या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव वाढला असून, तिसऱ्या महायुद्धाची भीती व्यक्त केली जात आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share