India Morning News
नवी दिल्ली – भारत-पाकिस्तान तणाव दिवसेंदिवस गहिरा होत आहे. शनिवारी पहाटे भारताने दोन पाकिस्तानी लढाऊ विमानं पाडत मोठं यश मिळवलं आहे. हे विमाने श्रीनगरजवळील लसजन परिसर आणि उत्तर काश्मीरमध्ये निष्क्रय करण्यात आली. यामुळे पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री पाकिस्तानने भारतातील २६ ठिकाणांवर ड्रोनद्वारे हल्ला चढवला. यासोबतच दिल्लीवर ‘फतह-२’ प्रकारचं क्षेपणास्त्र डागण्यात आलं होतं. मात्र सिरसा येथील हवाई संरक्षण प्रणालीने वेळीच हस्तक्षेप करत हे क्षेपणास्त्र आकाशातच निष्प्रभ केलं.या हल्ल्यांना उत्तर देताना भारताने जोरदार पलटवार केला आहे.
पहाटेच्या कारवाईत पाकिस्तानातील रावळपिंडी, रफीकी आणि मुरीद येथील तीन लष्करी हवाई तळांवर सर्जिकल स्ट्राइक करत गंभीर नुकसान केलं. यामुळे पाकिस्तानने आपलं संपूर्ण हवाई क्षेत्र तातडीने बंद केलं आहे.

6 मेपासून पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. त्यात आता दिल्लीसारख्या राजधानीच्या दिशेनेही हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. पण भारतीय सैन्याने पाकिस्तानचे हे सर्व डाव हाणून पाडले असून, प्रत्येक आक्रमणाला ठोस प्रत्युत्तर दिलं जात आहे.ताज्या घडामोडींनुसार, पाकिस्तानने आपले विमानतळ प्रवाशांसाठी बंद ठेवले असून देशातील अनेक पेट्रोल पंप पुढील ४८ तासांसाठी बंद करण्यात आले आहेत. अधिकृत युद्ध जाहीर झालेले नसतानाही सीमारेषेवरील संघर्ष चिघळत आहे आणि परिस्थिती अत्यंत गंभीर बनत चालली आहे.








Comments are closed