Shopping cart

  • Home
  • Politics
  • येरखेडा नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे १८ उमेदवार रिंगणात; राजकिरण बर्वे यांच्यासह अर्ज दाखल

येरखेडा नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे १८ उमेदवार रिंगणात; राजकिरण बर्वे यांच्यासह अर्ज दाखल

November 18, 20251 Mins Read
Rajkiran Barve
197

India Morning News

Share News:
Share

येरखेडा:नागपूर जिल्ह्यातील येरखेडा नगरपंचायतच्या येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारी दाखवली आहे. सोमवारी पक्षाचे अधिकृत उमेदवार व माजी नगराध्यक्ष राजकिरण बर्वे यांनी नगराध्यक्षपदासाठी, तर पक्षाच्या १७ जागांसाठी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. एकूण १८ अर्ज भरल्याने भाजपने सर्व १७ जागांवर तसेच नगराध्यक्षपदावर दावा ठोकला आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे सकाळी ११ वाजता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मिरवणूक काढून अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी आमदार अशोक कटोले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, कळमेश्वर तालुका अध्यक्ष संदीप गिऱ्हे, उमेदवारी अर्ज दाखल करणारे राजकिरण बर्वे, नगरसेवक प्रशांत बर्वे, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष दिपक चौरागडे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत भलावी, माजी जि.प. सदस्य प्रदीप कामडोळकर, भाजप नेते गजानन बर्वे, तुलशीराम मडावी, प्राचार्य राजू घनोकरिकर, रवींद्र बर्वे, नगरसेवक रवी भलावी, प्रवीण गिऱ्हे आदींसह पक्षाचे सैकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना राजकिरण बर्वे यांनी येरखेडाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला. “गेल्या काळात जनतेने दिलेल्या प्रचंड साथीमुळे पुन्हा एकदा संधी मिळाल्यास शहराला आदर्श नगरपंचायत बनवू,” असे त्यांनी सांगितले. उपस्थित सर्व नेत्यांनी उमेदवारांना विजयाची शुभेच्छा दिल्या.

येरखेडा नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या या दमदार एंट्रीमुळे इतर पक्षांना मोठा आव्हान निर्माण झाले आहे.

 

Share News:
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

Share