India Morning News
येरखेडा: भारतीय जनता पार्टीच्या विचारधारा आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सुलभरित्या नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी येरखेडा येथे भाजप वॉर रूमचे उद्घाटन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रशांत (बाल्या) काळे यांच्या नेतृत्वाखाली सुशांत सलाम, ईशांत सिंग ठाकुर, यश शाहू, संदीप खरवडे, प्रकाश लांबाळे, प्रथमेश बोंदरे, प्रवेश डोनारकर, मनिष ठवकर, रोशन उलंगवार, गिरीश राघोते, राहुल ठवकर, मंगेश ठाकरे, कपिल परतेकी, आयुष बोंद्रे, अश्विन मेश्राम, ऋषभ मेंढे, जय अहिरवार, पवन शिवणकर, विलास पारसे, दिलीप काटे, राजू काटे, सुरेश राऊत, संतोष तिवारी, अतुल धोंगडे, सोनू शाहू, राजू कोहडे, रवी मडावी, शुभम बंड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव आशिष वंजारी, तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा राजकिरण बर्वे, गजानन तिरपुडे, सोनू सूर्यवंशी, अंकित वाघ, राहुल शर्मा, अरुण कुशवाह, राकेश खरोले, विलास पाटील, निशिताताई देवके, कोमलताई कळसकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.









Comments are closed