Shopping cart

  • Home
  • News
  • भाजपचा डाव ;शेतकरी कामगार पक्षात फूट, जयंत पाटलांना घरच्याघरात धक्का!

भाजपचा डाव ;शेतकरी कामगार पक्षात फूट, जयंत पाटलांना घरच्याघरात धक्का!

April 17, 20251 Mins Read
70

India Morning News

Share News:
Share

मुंबई:महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप घडवणारी एक घटना समोर आली आहे. सत्तेत आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार राजकीय रणनीती राबवत इतर पक्षांतील महत्त्वाचे चेहरे आपल्या गोटात खेचण्यास सुरुवात केली आहे. मागील काही महिन्यांपासून भाजपमध्ये सातत्याने नेत्यांचा ओघ सुरू असून, आता पक्षाने आणखी एक मास्टरस्ट्रोक खेळला आहे.

जयंत पाटलांच्या घरातूनच सुरु झाली भाजपची मोहीम

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या कुटुंबात भाजपने थेट प्रवेश केला आहे. जयंत पाटील यांचे सख्खे भाऊ पंडित पाटील आणि त्यांचे भाचे आस्वाद पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात पार पडला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा घडलेला बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

पंडित पाटील यांचा राजकीय प्रवास

पंडित पाटील हे शेकापचे माजी आमदार असून रायगड जिल्हा बँकेचे अध्यक्ष देखील आहेत. 2014 मध्ये त्यांनी अलिबाग विधानसभा मतदारसंघातून शेकापच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. रायगड जिल्ह्यात शेकापचा जोरदार प्रभाव असून, या भागात त्यांच्या भूमिकेला निवडणुकांमध्ये नेहमीच वजन असते.

भाजपमध्ये जोरदार इनकमिंग

मागील काही दिवसांत भाजपमध्ये अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे. यामध्ये कागलचे माजी आमदार संजय घाडगे, शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, काँग्रेसचे नेते प्रसाद हिरे, फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले आणि माजी नगरसेविका मधुबाला भोसले यांचा समावेश आहे. या प्रवेशांमुळे विरोधकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, भाजपची वाढती ताकद सत्ताधारी पक्षासाठी मोठे बळ ठरते आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share