India Morning News
मुंबई:भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) पश्चिम महाराष्ट्र विभागाची संघटनात्मक बैठक मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सह-संघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि केंद्रीय राज्यमंत्री तसेच प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मंडलाध्यक्ष निवड, सक्रिय सदस्य नोंदणी आणि पक्ष संघटन मजबूत करण्यावर सविस्तर चर्चा झाली.पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला मोठा जनाधार नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला मोठा जनाधार मिळाला आहे.
प्राथमिक सदस्यत्व नोंदणीत पक्षाने उल्लेखनीय कामगिरी केली असून, सक्रिय सभासद नोंदणीतही आघाडी घेतली आहे. या बैठकीत सक्रिय सदस्य नोंदणी प्रक्रिया अधिक प्रभावी आणि गतिमान करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, मंडलाध्यक्ष निवडीबाबतही विस्तृत संवाद झाला.
बैठकीला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील, ॲड. माधवी नाईक, मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार भीमराव तापकीर, आमदार हेमंत रासने, दिलीप कांबळे, जगदीश मुळीक यांच्यासह शहर सरचिटणीस उपस्थित होते.
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला गती देण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर नेतृत्व मजबूत करण्यासाठी या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाच्या वाढत्या प्रभावाला आणखी बळकटी देण्यासाठी सक्रिय सदस्य नोंदणी आणि मंडलाध्यक्ष निवड प्रक्रियेवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले.










Comments are closed