Shopping cart

  • Home
  • News
  • BSF नोकरी 2025: अर्ज प्रक्रिया सुरू, हेड कॉन्स्टेबल पदांसाठी संधी!

BSF नोकरी 2025: अर्ज प्रक्रिया सुरू, हेड कॉन्स्टेबल पदांसाठी संधी!

September 22, 20251 Mins Read
244

India Morning News

Share News:
Share

नागपूर: देशसेवेची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी – बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) मध्ये हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर आणि हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिक या पदांसाठी थेट भरती सुरु झाली आहे.

अर्जाची अंतिम तारीख: इच्छुक उमेदवार 23 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अर्जाची लिंक: rectt.bsf.gov.in – अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा.

शैक्षणिक पात्रता:
12वी उत्तीर्ण, विषय: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित.
किमान 60% गुण आवश्यक.
10वी नंतर संबंधित ट्रेडमध्ये 2 वर्षांचे ITI प्रमाणपत्र असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा:
सामान्य वर्ग: 18–25 वर्षे
OBC: 18–28 वर्षे
SC/ST: 18–30 वर्षे
राखीव वर्गासाठी नियमांनुसार सवलत उपलब्ध.
वयाची गणना 23 सप्टेंबर 2025 च्या आधारावर.

अर्ज शुल्क:
सामान्य/OBC/EWS: ₹100 + ₹59 CSC/कर
SC/ST/महिला: अर्ज मोफत

अर्ज कसा करावा-

  • BSF च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • “Current Recruitment Openings” विभागात हेड कॉन्स्टेबल भरती लिंक क्लिक करा.
  • प्रथम नोंदणी करा आणि वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • लागू असल्यास अर्ज शुल्क भरा.
  • फॉर्म पूर्णपणे भरल्यानंतर सबमिट करा आणि प्रिंटआउट काढून ठेवा.

ही संधी देशसेवेच्या इच्छुक तरुणांसाठी अत्यंत महत्वाची आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यास विलंब करू नये.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share