Shopping cart

  • Home
  • News
  • रिझर्व्ह बँकेत करिअरची संधी; ग्रेड बी ऑफिसरच्या 120 जागांसाठी भरती सुरू

रिझर्व्ह बँकेत करिअरची संधी; ग्रेड बी ऑफिसरच्या 120 जागांसाठी भरती सुरू

September 11, 20251 Mins Read
रिझर्व्ह बँक भरती
267

India Morning News

Share News:
Share

मुंबई : देशातील सर्वात प्रतिष्ठित नोकऱ्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (RBI) अधिकारी होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. बँकेने ग्रेड बी ऑफिसरच्या 120 पदांसाठी भरती जाहीर केली असून उमेदवारांना 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

पदांची विभागणी
ग्रेड बी (जनरल) : 83 पदे
ग्रेड बी (DEPR) : 17 पदे
ग्रेड बी (DSIM) : 20 पदे
या पदांसाठीची लेखी परीक्षा 18 आणि 19 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे.

शैक्षणिक पात्रता
जनरल : कोणत्याही शाखेत पदवी, किमान 60% गुण (SC/ST/दिव्यांग – 55%).
DEPR : इकॉनॉमिक्स किंवा फायनान्समध्ये पदव्युत्तर / पीजीडीएम / एमबीए.
DSIM : गणित किंवा संख्याशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी.
उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमानुसार सवलत आहे.

परीक्षा शुल्क
खुला, ओबीसी, ईडब्ल्यूएस : ₹850 + GST
SC, ST, दिव्यांग : ₹100 + GST
नोंदणी व अर्ज प्रक्रिया opportunities.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

निवड प्रक्रिया
दोन टप्प्यातील ऑनलाईन परीक्षा
त्यानंतर मुलाखत
ग्रेड बी ऑफिसर पदासाठी खुल्या व ईडब्ल्यूएस उमेदवारांना जास्तीत जास्त 6 प्रयत्नांची संधी मिळेल, तर इतर प्रवर्गांवर ही मर्यादा लागू होणार नाही.

वेतन व सुविधा
मूळ वेतन : ₹78,450 प्रतिमहा
सर्व भत्त्यांसह एकूण वेतन साधारण ₹1.5 लाख प्रतिमहा
निवासस्थान उपलब्ध न झाल्यास दरमहा घरभाडे भत्ता (HRA)
रिझर्व्ह बँकेत अधिकारी पदावर नियुक्ती ही केवळ आर्थिक स्थैर्यच नव्हे, तर उच्च प्रतिष्ठा देणारी ठरणार आहे. या भरतीमुळे देशभरातील स्पर्धा परीक्षार्थ्यांना बँकिंग क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी मिळणार आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share