Shopping cart

  • Home
  • News
  • अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विधिसंघर्षबालका विरुद्ध गुन्हा दाखल

अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विधिसंघर्षबालका विरुद्ध गुन्हा दाखल

May 24, 20251 Mins Read
424

India Morning News

Share News:
Share

शस्त्र आणि चार मोबाइल सह ६९,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत हिंदुस्थान काॅलनी कांद्री येथे पोलीसांना विधिसंघर्षबालका चा घरी तलवार मिळुन आल्याने पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन शस्त्र आणि चार मोबाइल सह ६९,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे . प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरुवार (दि.२२) मे रोजी दुपारी ३ वाजता च्या दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हान , सचिन वेळेकर , अमोल नागरे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि एक अल्पवयीन विधिसंघर्सबालक हा स्टिलची धारदार टोकदार तलवार बाळगुन तो लोकांना दुखापत करण्याची भीती दाखवित असतो . त्यामुळे लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे . अश्या माहिती वरुन पोलीसांनी हिंदुस्थान काॅलनी कांद्री येथे जावुन संशयीत अल्पवयीन बालकाचा शोध घेतला असता बालक हा आपल्या राहत्या घरी मिळुन आला . पोलीसांनी त्याला लोकांच्या मनात दहशत निर्माण करीत असलेली तलवार काढून देण्यास सांगीतले. अल्पवयीन बालकाने घरातील लोखंडी आलमारीतून एका लाकडी कव्हर असलेल्या म्यानमधुन तलवार काढून दिली. पोलीसांनी बालकास तलवार बाळगणाच्या इरादा काय , असे विचारले असता त्यांनी लोकांनी धाक दाखविण्याकरिता तलवार आणली आहे असे सांगितले . तलवार बाळगण्याचा परवाना आहे का असे विचारले असता बालकाने कोणताही परवाना नसल्याचे सांगीतले . पोलीसांनी अल्पवयीन बालकास ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन तलवार आणि चार अॅनड्राईड मोबाइल सह एकुण ६९,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे . सदरची कारवाई कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात , सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हान , सचिन वेळेकर , अमोल नागरे सह आदि पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share