India Morning News
पिंपरी-चिंचवड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या ऐतिहासिक आणि धाडसी निर्णयाचे भारतीय जनता पार्टी (भाजप) पिंपरी-चिंचवड शहरातर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले. या निर्णयामुळे समाजातील सर्व स्तरांचा विकास साध्य होण्यास मदत होईल, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.
भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली भोसरीतील इंद्रायणीनगर, नेहरूनगर मंडलातर्फे प्रभाग क्रमांक ९, मासूळकर अजमेरा कॉलनी, नेहरूनगर येथे पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेविका वैशाली खाड्ये,भाजपचे शहर सरचिटणीस संजय मँगोडेकर, मंडल अध्यक्ष शिवराज लांडगे, कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत लांडगे, ज्येष्ठ कार्यकर्ते माणिकराव अहिरराव, अर्जुन ठाकरे, फारूक इनामदार, मंगेश कुलकर्णी, मोहन पवार, आशा काळे, वीणा सोनवलकर, रोहिणी मांढरे, राजश्री साहा, पल्लवी ठाकरे, तुषार वाघेरे, संदेश साळुंखे, विनोद पाटील, सुभाष फाटक, तुळशीराम दाते, एकनाथ दांदळे, थोरात काका, विजू पवार, सुहास पलांडे, सागर धोत्रे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा निर्णय विकसित भारताच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले. समाजातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय मोलाचा ठरेल, असेही त्यांनी नमूद केले






Comments are closed